बातम्या

तिरंगा विकास मंच, केनवडे आयोजित भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

Grand blood donation camp organized


By nisha patil - 9/21/2026 4:26:31 PM
Share This News:



तिरंगा विकास मंच, केनवडे आयोजित भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

कागल प्रतिनिधी अजित बोडके केनवडे : तिरंगा विकास मंच, केनवडे यांच्या वतीने आयोजित भव्य रक्तदान शिबिर रविवार, दि. 20 सप्टेंबर रोजी उत्साहात पार पडले.

सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत तिरंगा विकास मंच कार्यालय, केनवडे येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 'रक्तदान करा | जीवदान करा | समाजसेवा हीच खरी सेवा' या संदेशाने प्रेरित होऊन गावातील तरुणांनी, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

गणेशोत्सवाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरामध्ये जमा झालेले रक्त गरजू रुग्णांसाठी उपयोगी पडणार आहे. यावेळी अनेक रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले.

या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, तिरंगा विकास मंचच्या या सामाजिक कार्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

 


तिरंगा विकास मंच, केनवडे आयोजित भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न
Total Views: 36