बातम्या
खोची येथे KPL अध्यक्ष चषक 2025 स्पर्धेचा भव्य समारोप...
By nisha patil - 4/21/2025 3:43:48 PM
Share This News:
खोची येथे KPL अध्यक्ष चषक 2025 स्पर्धेचा भव्य समारोप...
बक्षीस वितरण आमदार डॉ. अशोकराव माने यांच्या हस्ते"संपन्न
खोची (ता. हातकणंगले) | अमरसिंह पाटील फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित KPL अध्यक्ष चषक 2025 या भव्य क्रिकेट स्पर्धेचा समारोप आणि बक्षीस वितरण सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे दलितमित्र आमदार डॉ. अशोकराव माने (बापू), ज्यांच्या शुभहस्ते विजेत्या संघांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
या प्रसंगी भाजपा हातकणंगले तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील यांची विशेष उपस्थिती होती. याशिवाय वसंत गुरव, शितल मगदूम, श्रीकांत पाटील, दिनकर पाटील, अमोल निकम, चंद्रकांत भंडारी, दिलीपराव पाटील, पोपट गुरव, शंकर चौगुले, जयंत पाटील, गुणधर मडके, जगदीश पाटील, जालिंदर पाटील, स्वीय सहायक सुहास राजमाने, उद्योजक धनंजय टारे, सुशांत पाटील, हर्षवर्धन चव्हाण, विजय बाबर आदी मान्यवर उपस्थित होते.
खोची येथे KPL अध्यक्ष चषक 2025 स्पर्धेचा भव्य समारोप...
|