बातम्या
रुकडीचे सुपुत्र इस्माईल पेंढारी यांचा भव्य सत्कार
By nisha patil - 4/28/2025 1:44:02 PM
Share This News:
रुकडीचे सुपुत्र इस्माईल पेंढारी यांचा भव्य सत्कार
रुकडी गावचे सुपुत्र श्री इस्माईल पेंढारी यांची नुकतीच सीबीआयच्या अँटी करप्शन ब्रांच, दिल्ली येथे पोलीस अधीक्षक पदावर पदोन्नती झाली आहे. त्यांच्या या यशस्वी प्रवासानंतर जिल्हा परिषद सदस्य श्री बबलू मकानदार, माजी सरपंच रफिक कलावंत, मा. उपसरपंच शितल खोत, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल उपाध्ये अण्णा व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला.
श्री पेंढारी यांनी आपल्या प्रामाणिक व जिद्दीच्या कामगिरीमुळे राष्ट्रपती पदकासह विविध शासकीय पुरस्कार प्राप्त केले आहेत. सामान्य कुटुंबातून आलेल्या श्री पेंढारी यांनी बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्याची भूमिका सातत्याने बजावली आहे. त्यांचे व्यक्तिमत्व तरुण पिढीसाठी आदर्शवत आहे. त्यांच्या या यशामुळे रुकडी गावाचा व समई भागाचा नावलौकिक वाढवला आहे.
रुकडीचे सुपुत्र इस्माईल पेंढारी यांचा भव्य सत्कार
|