बातम्या
गणेशोत्सवानिमित्त रूकडी येथे भव्य मोफत आरोग्य शिबिर..
By nisha patil - 5/9/2025 12:23:50 PM
Share This News:
गणेशोत्सवानिमित्त रूकडी येथे भव्य मोफत आरोग्य शिबिर..
७५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य
रूकडी (ता. हत्कानंगले) : राघोबा पाटील तालीम मंडळ व नारायणी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर व आयुष्यमान भारत कार्ड कॅम्प पार पडला. दीडशेहून अधिक नागरिकांनी लाभ घेतला तर तज्ञ डॉक्टर्सनी मार्गदर्शन केले. महिलांसाठी आयोजित ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या उपक्रमासाठी अध्यक्ष सुनील भारमल, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे विशेष योगदान लाभले. पुढील वर्षी तालीम मंडळाचा ७५ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करून विविध सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रम राबवले जाणार असल्याचे मंडळाने जाहीर केले.
गणेशोत्सवानिमित्त रूकडी येथे भव्य मोफत आरोग्य शिबिर..
|