बातम्या
जयसिंगपूरमध्ये शिवप्रतिमेचे भव्य लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते
By nisha patil - 6/5/2025 9:26:47 PM
Share This News:
जयसिंगपूरमध्ये शिवप्रतिमेचे भव्य लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते
"घुस के मारेंगे!" – शिंदेंचा पाकिस्तानला कडक इशारा
जयसिंगपूर नगरपरिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारूढ पुतळा आणि संग्रहालयाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. ५० वर्षांची जयसिंगपूरकरांची मागणी आज पूर्ण झाली.
यावेळी शिंदे म्हणाले, “पहेलगाम हल्ल्यासाठी जबाबदार असणाऱ्यांना सोडणार नाही, हा नवा भारत आहे – घुसून मारू!”उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे हातकणंगले येथे स्वागत मा.आमदार डॉ सुजित मिणचेकर ( संचालक - गोकुळ दूध संघ, कोल्हापूर)यांनी केले तसेच आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, आरोग्य तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर साहेब, खासदार धैर्यशील मानेदादा, माजी खासदार संजय मंडलिक साहेब, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अशोकराव माने, आमदार किसन वानखेडे, जिल्हाप्रमुख रवींद्र माने, संजय पाटील यड्रावकर आणि जिल्हा प्रशासनातील सर्व प्रमुख अधिकारी, कर्मचारी तसेच शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते....
जयसिंगपूरमध्ये शिवप्रतिमेचे भव्य लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते
|