विशेष बातम्या

"चरणे दातांचा दवाखाना" कोडोली येथे भव्य उद्घाटन सोहळा

Grand inauguration ceremony


By nisha patil - 12/5/2025 2:29:39 PM
Share This News:



"चरणे दातांचा दवाखाना" कोडोली येथे भव्य उद्घाटन सोहळा

 कोडोली (ता. पन्हाळा) – डॉ. सत्यजित दिलीप चरणे (रा. पारगाव) यांनी कोडोली येथे नव्याने सुरू केलेल्या "चरणे दातांचा दवाखाना" या दवाखान्याचे उद्घाटन आमदार डॉ. विनय कोरे (सावकार) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

या उद्घाटन सोहळ्याला हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलितमित्र डॉ. अशोकराव माने (बापू), पुणे शिक्षक मतदारसंघाचे आमदार जयंत आसगावकर, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयसिंह माने (भैय्या), वारणा दूध संघाचे व्हा. चेअरमन एच. आर. जाधव (आण्णा) आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.

या प्रसंगी लोकमतचे पत्रकार दिलीप लक्ष्मण चरणे, अभिजीत दिलीप चरणे, अरुण शिंदे, विशाल जाधव, अभिजित गायकवाड, शिवाजी पाटील, शिवाजी सिद, नितीन हुजरे, मोहन आजमणे, राजेंद्र माने, विश्वास माने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या नव्या दवाखान्याच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना आधुनिक व दर्जेदार दंत उपचार मिळतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


"चरणे दातांचा दवाखाना" कोडोली येथे भव्य उद्घाटन सोहळा
Total Views: 193