बातम्या

अतिग्रे येथे आनंदी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा भव्य उद्घाटन सोहळा

Grand inauguration ceremony of Anandi


By nisha patil - 2/5/2025 4:22:38 PM
Share This News:



अतिग्रे येथे आनंदी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा भव्य उद्घाटन सोहळा

अतिग्रे (ता. हातकणंगले) येथे नूतन बांधलेल्या आनंदी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चा उद्घाटन सोहळा अत्यंत भव्य थाटात पार पडला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूरचे लोकप्रिय खासदार श्री. धैर्यशील माने दादा व माजी खासदार डॉ. श्रीमती निवेदिता माने उपस्थित होत्या.

कार्यक्रमाला आमदार अशोकराव माने (बापू), डॉ. राहुल देशमुख, डॉ. क्रांती देशमुख, नगराध्यक्षा सौ. नीता माने, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष अविनाश बनगे, मा. जि.प. सदस्य बबलू मकानदार, श्रीधर पाटील अण्णा, गोव्याचे माजी इलेक्शन कमिशनर डी. एन. कांबळे, तसेच अनेक मान्यवर, सरपंच, उपसरपंच, पत्रकार, डॉक्टर्स आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या रुग्णालयामुळे परिसरातील नागरिकांना आधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार असून, आरोग्यसेवेच्या दृष्टीने हा उपक्रम महत्वाचा ठरणार आहे.


अतिग्रे येथे आनंदी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा भव्य उद्घाटन सोहळा
Total Views: 109