बातम्या

मुरगूड नगरपरिषद निवडणुकीसाठी महायुतीचा प्रचारभव्य शुभारंभ...

Grand inauguration of Mahayuti


By nisha patil - 11/25/2025 5:35:27 PM
Share This News:



मुरगूड नगरपरिषद निवडणुकीसाठी महायुतीचा प्रचारभव्य शुभारंभ...

मुरगूड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपा–शिवसेना महायुतीच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ मोठ्या ताकतीने संपन्न झाला. या सोहळ्याचे उद्घाटन भाजपचे ज्येष्ठ नेते मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत झाले. सोहळ्याच्या प्रारंभावरच आई अंबाबाईचे श्रीफळ वाढवून शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.

चंद्रकांत दादांनी या प्रसंगी सांगितले की, “आई अंबाबाईच्या कृपेने मुरगूड नगरपरिषद महायुतीकडेच विश्वास दाखवेल आणि विजयाचा भगवा झेंडा नक्कीच फडकेल.” त्यांनी पुढे प्रतिपादन केले की, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली महायुतीचे सर्व शिलेदार एकमताने काम करत आहेत आणि जनतेचा विश्वास व विकासाच्या बळावर मुरगूडचा सर्वांगीण विकास साध्य करण्याचा संकल्प केला जातोय.

या शुभारंभ सोहळ्यास माजी खासदार मा. संजयजी मंडलिक, मा. प्रवीण पाटील, मा. संजय घाटगे, मा. नाथाजी पाटील, मा. महेश जाधव, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. सुहासिनी पाटील आणि मुरगूडचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सोहळ्यातील वातावरण उत्साही होते, तर उपस्थित कार्यकर्ते आणि नागरिकांनी प्रचाराची सुरुवात धुमधडाकेबाज पद्धतीने झाल्याचे सांगितले. महायुतीने या नगरपालिकेत विजय मिळवण्याचा दृढ संकल्प दर्शवला.


मुरगूड नगरपरिषद निवडणुकीसाठी महायुतीचा प्रचारभव्य शुभारंभ...
Total Views: 25