विशेष बातम्या
पट्टणकोडोलीत संत बाळूमामा मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलचे भव्य उद्घाटन
By nisha patil - 4/8/2025 2:59:48 PM
Share This News:
पट्टणकोडोलीत संत बाळूमामा मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलचे भव्य उद्घाटन
श्री संत बाळूमामा हॉस्पिटलचा शुभारंभ, आरोग्यमंत्री आबिटकर व खासदार माने यांच्या हस्ते उद्घाटन
श्री संत बाळूमामा मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा राज्याचे आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते संपन्न झाला.या प्रसंगी खासदार धैर्यशील माने, आमदार डॉ. सुजित मिणचेकर आणि आमदार अशोकराव माने यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमास अवनी संस्थेच्या अध्यक्षा सौ. अनुराधा भोसले, सरपंच नम्रता माळी, अर्जुन शिंगारे, डॉ. राजपूत, डॉ. शिंगे, डॉ. थोरात, उपजिल्हाप्रमुख स्वामी सर, बांधकाम कामगार संघटनेचे आनंदा मोरे, संदीप तोडकर, महेश नाझरे, किसन तिरपणकर, अशोक हुपरे, शिवाजी डावरे, पोपट कांबळे, प्रकाश जाधव, सतीश हुपरे, मारुती रांगोळे, प्रकाश पाटील, राम शिंगारे, शिवा स्वामी आदींसह ग्रामपंचायत सदस्य, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या नव्या हॉस्पिटलच्या स्थापनेमुळे परिसरातील नागरिकांना तातडीने व सर्वसमावेशक वैद्यकीय सेवा मिळणार असून, ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांना मोठी चालना मिळणार आहे.
पट्टणकोडोलीत संत बाळूमामा मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलचे भव्य उद्घाटन
|