विशेष बातम्या

मलकापूरमध्ये शिवराज्य भवनचे भव्य उद्घाटन...

Grand inauguration of Shivrajya Bhavan in Malkapur


By nisha patil - 5/8/2025 4:21:10 PM
Share This News:



मलकापूरमध्ये शिवराज्य भवनचे भव्य उद्घाटन...

शैक्षणिक व आरोग्य सुविधा एकाच छताखाली; मलकापूरमध्ये अभिनव उपक्रम
 

 मलकापूर (ता. शाहूवाडी) येथे 1 कोटी रुपये निधीतून उभारण्यात आलेल्या शिवराज्य भवन या बहुउद्देशीय इमारतीचे उद्घाटन आमदार डॉ. विनय कोरे आणि खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते संपन्न झाले. या भवनात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, सुसज्ज ग्रंथालय व वाचनालयाच्या सोयी उपलब्ध करून बहुजन समाजातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यात आले आहे.

त्याचवेळी ज्येष्ठ नागरिक आरोग्य तपासणी शिबीराचे उद्घाटनही करण्यात आले. कार्यक्रमास अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमांमुळे मलकापूरच्या शैक्षणिक व सामाजिक विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


मलकापूरमध्ये शिवराज्य भवनचे भव्य उद्घाटन...
Total Views: 67