बातम्या
घुणकीत श्री. मंगेश सह. पतसंस्थेचे भव्य उद्घाटन
By nisha patil - 5/5/2025 8:53:56 PM
Share This News:
घुणकी (ता. हातकणंगले) येथे श्री. मंगेश को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे उद्घाटन आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) व हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलितमित्र डॉ. अशोकराव माने (बापू) यांच्या शुभहस्ते पार पडले.
या प्रसंगी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयसिंह माने (भैय्या), वारणा कारखान्याचे संचालक उदय पाटील, दूध संघाचे संचालक राजवर्धन मोहिते, वारणा बँकेचे संचालक बाबासो बावडे, प्रकाश माने तसेच संस्थेचे संस्थापक चेअरमन धोंडीराम सिद, व्हा. चेअरमन अविनाश मगदूम, अशोक जाधव, संजय बुढढे, संभाजी पाटील, राजेंद्र कुंभार, पंडित जाधव, केशव कुरणे, धोंडीराम शेवाळे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
घुणकीत श्री. मंगेश सह. पतसंस्थेचे भव्य उद्घाटन
|