बातम्या
आ. राहुल आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धा
By nisha patil - 9/26/2025 2:47:44 PM
Share This News:
आ. राहुल आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धा
युवक-युवतींसह नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून योगेश पाटील यांच्या वतीने चांगदेव पाटील चौक, गणेश नगर येथे भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेचे उद्घाटन आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी त्यांनी खेळाडूंना प्रोत्साहित करताना निरोगी आयुष्यासाठी नियमित व्यायाम, धावणे आणि शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व अधोरेखित केले. परिसरातील युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग या स्पर्धेत पाहायला मिळाला.
स्पर्धकांनी उत्साह, जोश आणि शिस्तीचे प्रदर्शन करत मॅरेथॉनची शोभा वाढवली. या माध्यमातून तरुणाईत शारीरिक स्वास्थ्य, सामाजिक ऐक्य आणि सकारात्मक विचारांची भावना रुजवण्याचा संदेश देण्यात आला. विजेत्यांना बक्षिसे व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले, तर सर्व सहभागींचे अभिनंदन करण्यात आले.
कार्यक्रमाला पूर्व मंडल अध्यक्ष श्रीरंग खवरे, रवि जावळे, जनता बँकेचे संचालक राजू चव्हाण, प्रभाकर भोळ, संदीप पाटील, अनिकेत पाटील, युवराज चव्हाण, एकनाथ कांबळे, राजेंद्र भावीकट्टे, अक्षय कांबळे, राहुल पाटील, त्रिशूल पाटील, पृथ्वीराज कांबळे, महेश कारंडे, सागर पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
आ. राहुल आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धा
|