ताज्या बातम्या
शताब्दी वर्षानिमित्त संघाचे भव्य पथसंचलन!
By nisha patil - 5/11/2025 11:53:29 AM
Share This News:
गुरुनानक जयंती आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षपूर्तीनिमित्त ताराराणी नगर शाखेतर्फे बुधवारी (५ नोव्हेंबर २०२५) सकाळी ७ वाजता कदमवाडी-भोसलेवाडी परिसरात भव्य पथसंचलन आयोजित करण्यात आले.
समता हायस्कूलपासून सुरुवात झालेल्या या संचलनात स्वयंसेवकांनी राष्ट्रभक्तीचा आणि सेवाभावाचा संदेश दिला. संचलन मार्गावर नागरिक, महिला भगिनी आणि बाल स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
संचलनाचे स्वागत रांगोळ्या, पुष्पवृष्टी, आणि “भारत माता की जय” या घोषणांनी करण्यात आले.
या वेळी विभाग संघचालक प्रताप दड्डीकर, शहर संघचालक प्रमोद ढोले, शहर सहकार्यवाह महेश कोगेकर, तसेच ताराराणी नगर कार्यवाह सुनील आडवी उपस्थित होते.
संघाच्या शौर्य, सेवाभाव, आणि एकात्मतेचे दर्शन घडवणाऱ्या या संचलनाने परिसरात उत्साह आणि देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले.
शताब्दी वर्षानिमित्त संघाचे भव्य पथसंचलन!
|