बातम्या

इचलकरंजीत भगवान महावीर जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा; आवाडे परिवारासह जैन समाजाचा उत्स्फूर्त सहभाग

Grand procession on the occasion of Lord Mahavir Jayanti in Ichalkaranjit


By Administrator - 11/4/2025 4:21:48 PM
Share This News:



इचलकरंजीत भगवान महावीर जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा; आवाडे परिवारासह जैन समाजाचा उत्स्फूर्त सहभाग

इचलकरंजी येथील भगवान महावीर जयंती उत्सव मंडळ व सकल जैन समाज यांच्या वतीने भगवान महावीर यांचा २६२४ वा जन्मकल्याण सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

तसेच सकल जैन समाजाच्या वतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती या मिरवणुकी मध्ये सहकार महर्षी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे दादा, माजी मंत्री प्रकाशआण्णा आवाडे, उत्तमआण्णा आवाडे, माजी नगराध्यक्षा सौ किशोरीताई आवाडे, सौ सपना आवाडे वहिनी, क आवाडे इचलकरंजी जनता सह बँकेचे चेअरमन स्वप्निलदादा आवाडे, आमदार राहुल आवाडे साहेब, सौ वैशालीताई आवाडे, सौ मोसमी आवाडे वहिनी, सौ रेवती आवाडे वहिनी, सौ सना आवाडे वहिनी, आदित्य आवाडे यांच्यासह आवाडे परिवारातील सदस्यांनी सहभाग घेऊन जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या.

यावेळी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, उदय चौगुले, गुड्डाप्पाा रोजे मामा व इतर मान्यवर यांच्यासह शोभायात्रेमध्ये रथ, वाद्यपथक यासोबत अनेक श्रावक, श्राविका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


इचलकरंजीत भगवान महावीर जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा; आवाडे परिवारासह जैन समाजाचा उत्स्फूर्त सहभाग
Total Views: 114