बातम्या
शाहू जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा — शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचा उपक्रम
By nisha patil - 6/26/2025 11:15:57 PM
Share This News:
शाहू जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा — शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचा उपक्रम
कोल्हापूर |राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 151व्या जयंतीनिमित्त श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या वतीने दसरा चौकातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेची सुरुवात राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आणि श्रीफळ वाढवून करण्यात आली. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील व संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे उपस्थित होते.
शोभायात्रेत विविध शैक्षणिक संस्थांनी सामाजिक आणि ऐतिहासिक विषयांवर देखावे सादर केले. अंधश्रद्धा निर्मूलन, शाहू महाराजांचे शैक्षणिक कार्य, औद्योगिक शिक्षण, आरोग्य आणि माणगाव परिषद यासारख्या विषयांचा समावेश होता.
शोभायात्रेत एन.एस.एस. आणि एन.सी.सी. विद्यार्थ्यांनी संचलन करत समता दिंडीत सहभाग घेतला. कार्यक्रमात शहाजी महाविद्यालय, आयटीआय, फार्मसी कॉलेज, साई हायस्कूल, इंग्लिश मीडियम स्कूल आदी संस्थांचे विद्यार्थी, शिक्षक, प्राचार्य, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा जागर करण्यासाठी सर्व विभागांमध्ये विविध उपक्रम राबवले गेले. संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे यांनी या उपक्रमांना भरभरून पाठिंबा दिला.
शाहू जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा — शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचा उपक्रम
|