विशेष बातम्या

राजमाता जिजाऊ आणि महाराणी ताराबाई यांच्या चरित्रग्रंथाचे भव्य प्रकाशन

Grand publication of the biographies


By nisha patil - 12/5/2025 2:36:22 PM
Share This News:



राजमाता जिजाऊ आणि महाराणी ताराबाई यांच्या चरित्रग्रंथाचे भव्य प्रकाशन
 

इतिहासाचे डिजिटलायझेशन ही काळाची गरज – आमदार सतेज पाटील

मनोविकास प्रकाशन, पुणे यांच्यातर्फे लेखिका वसुधा पवार लिखित ‘राजमाता जिजाऊ साहेब’ आणि ‘महाराणी ताराबाई’ या चरित्र ग्रंथांचा प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला खासदार शाहू छत्रपती महाराज, याज्ञसेनीराजे छत्रपती, सरोजताई (माई) पाटील आणि आमदार सतेज पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली.
 

कार्यक्रमात बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले, “जिजाऊ मांसाहेब आणि महाराणी ताराबाई यांचा इतिहास वसुधा पवार यांनी अत्यंत प्रभावीपणे शब्दबद्ध केला आहे. हा इतिहास केवळ ग्रंथापुरता मर्यादित न ठेवता, पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याचे डिजिटलायझेशन होणे आवश्यक आहे.”
या सोहळ्याला संयोगिता राजे छत्रपती, दत्त सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन गणपतदादा पाटील, रणजीत शिंदे, मंजुश्रीताई पवार, मनोविकास प्रकाशनचे आशिष पाटकर, जयसिंगराव पवार, वसंतराव मुळीक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


राजमाता जिजाऊ आणि महाराणी ताराबाई यांच्या चरित्रग्रंथाचे भव्य प्रकाशन
Total Views: 100