विशेष बातम्या

दुसरे महायुध्द - अनुदान लाभार्थ्यांनी हयात दाखला जमा करावा

Grant beneficiaries should submit survival certificate


By nisha patil - 10/27/2025 3:33:37 PM
Share This News:



दुसरे महायुध्द - अनुदान लाभार्थ्यांनी हयात दाखला जमा करावा

कोल्हापूर, दि. 27 : जिल्ह्यातील दुसऱ्या महायुध्दाचे अनुदान घेत असलेल्या लाभार्थ्यांनी त्यांच्या हयातीचे दाखले 1 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर या कालावधीत स्विकारण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे हयातीचे दाखले प्राप्त झालेल्या लाभार्थींची अनुदानाची मागणी शासनाकडे करण्यात येते.

सर्व लाभार्थ्यांनी २० डिसेंबर पूर्वी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, शासकीय विश्रामगृह जवळ,लाईन बाजार रोड, कसबा बावडा,कोल्हापूर येथे प्रत्यक्ष किंवा ईमेलव्दारे zswo_kolhapur@maharashtra.gov.in जमा करावेत. तसेच हयातीचे दाखले जमा झाल्याची खात्री करण्यासाठी ०२३१- २६६५८१२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी (निवृत्त) ले. कर्नल भिमसेन चवदार यांनी केले.  


दुसरे महायुध्द - अनुदान लाभार्थ्यांनी हयात दाखला जमा करावा
Total Views: 27