बातम्या

दोन्ही पाणीपुरवठा संस्थांना १ कोटी ६ लाखांचे अनुदान; आमदार डॉ. विनय कोरे यांचा सत्कार

Grant of Rs 1 crore 6 lakhs to both water supply institutions


By nisha patil - 6/14/2025 3:05:28 PM
Share This News:



दोन्ही पाणीपुरवठा संस्थांना १ कोटी ६ लाखांचे अनुदान; आमदार डॉ. विनय कोरे यांचा सत्कार

तासगाव : मौजे तासगांव (ता. हातकणंगले) येथील  तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याच्या पुढाकारातून आमदार डॉ. विनयरावजी कोरे (सावकर) यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे तासगाव येथील दोन पाणीपुरवठा संस्थांना उपसा जलसिंचन योजनेतर्गत एकूण १ कोटी ६ लाख ६७ हजार ५०० रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे.

या योजनेंतर्गत,आमदार विनयरावजी कोरे (सावकर) पाणीपुरवठा संस्था – ₹५४,८१,२५०शुभलक्ष्मी विनयरावजी कोरे पाणीपुरवठा संस्था – ₹५१,८६,२५० या दोन्ही संस्थांना २५% अनुदानावर ही आर्थिक मदत मिळाली असून, या यशस्वी प्रयत्नाबद्दल आमदार डॉ. विनय कोरे यांचा संस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.


या कार्यक्रमास खासदार धैर्यशील दादा माने, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयसिंह माने (भैय्या), वारणा साखर कारखान्याचे संचालक सुभाष पाटील (मामा), प्रविण यादव (जि.प. माजी सभापती), डॉ. प्रदीप पाटील, शिवाजी रामा पाटील, डॉ. प्रताप पाटील, राजेंद्र माने (सह्याद्री शिक्षण संस्था अध्यक्ष) आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच संपतराव यशवंत पाटील (पाणीपुरवठा संस्था चेअरमन), उत्तमराव शंकर पाटील (शुभलक्ष्मी संस्था चेअरमन), सरपंच चंद्रकांत आण्णा गुरव, उपसरपंच सागर पाटील, ग्रामपंचायत सदस्य व शेकडो शेतकरी, सभासद, ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या उपक्रमामुळे तासगाव परिसरातील शेतीला आधार मिळणार असून, पाणीटंचाईच्या प्रश्नावर मोठा दिलासा मिळेल, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.


दोन्ही पाणीपुरवठा संस्थांना १ कोटी ६ लाखांचे अनुदान; आमदार डॉ. विनय कोरे यांचा सत्कार
Total Views: 80