बातम्या
महसूल मंत्री बावनकुळे यांना नाथाजी पाटील यांच्याकडून कृतज्ञतापूर्वक अभिवादन
By nisha patil - 7/25/2025 3:33:11 PM
Share This News:
महसूल मंत्री बावनकुळे यांना नाथाजी पाटील यांच्याकडून कृतज्ञतापूर्वक अभिवादन TH
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या लोकोपयोगी निर्णयांचे भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांच्याकडून अभिनंदन
महाराष्ट्रातील नागरिकांसाठी महसूल विभागामार्फत घेतल्या जाणाऱ्या क्रांतिकारी आणि लोकोपयोगी निर्णयांचे कौतुक करत भाजपाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांचा विशेष सत्कार केला.
या वेळी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची प्रतिमा आणि पुष्पगुच्छ देऊन मंत्री बावनकुळे यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अलकेश कांदळकर उपस्थित होते.
नाथाजी पाटील म्हणाले, "महसूल विभागामार्फत नागरीकांना अनेक प्रकारचे दाखले मिळवण्यासाठी होणारा त्रास कमी व्हावा यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना दाखले मिळवण्यासाठी आधी स्टॅम्प ड्युटी भरावी लागत होती, ती आता रद्द करण्यात आली आहे."
याशिवाय कौटुंबिक वाटणी पत्रांसाठी स्टॅम्प ड्युटीवरील सवलत, तुकडे-जोड तुकडे बंदी कायदा रद्द करणे, प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना मोफत वाळू देणे अशा अनेक निर्णयांमुळे सामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे, असेही त्यांनी नमूद केले.
या उपक्रमामुळे महसूल विभागाचे नागरिकांप्रती असलेले उत्तरदायित्व अधोरेखित होत असून, भविष्यातही असेच निर्णय घेऊन प्रशासनाला लोकाभिमुख करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
महसूल मंत्री बावनकुळे यांना नाथाजी पाटील यांच्याकडून कृतज्ञतापूर्वक अभिवादन
|