राजकीय
कोल्हापूरकरांप्रती कृतज्ञता! हर्षदा देशमुख-जाधव भावुक
By nisha patil - 3/11/2026 3:46:47 PM
Share This News:
कोल्हापूरकरांप्रती कृतज्ञता! हर्षदा देशमुख-जाधव भावुक
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा झेंडा फडकवल्यानंतर नवनिर्वाचित आमदार हर्षदा देशमुख-जाधव यांचा कोल्हापुरात जिल्हा काँग्रेसच्या वतीने जंगी सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी आमदार सतेज पाटील यांची भेट घेतली.
या विजयात कोल्हापूरकरांचा सर्वात मोठा वाटा असल्याची भावना हर्षदा देशमुख-जाधव यांनी व्यक्त केली. आभार मानण्यापेक्षा मी कोल्हापूरकरांप्रती कृतज्ञता व्यक्त करेन. कोल्हापूरकरांनी मला लेकीसारखं पदरात घेतलं. आज प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून प्रत्येकालाच आपण आमदार झाल्यासारखं वाटत आहे, अशा भावनिक शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
दरम्यान, आमदार सतेज पाटील यांनी पेपरफुटीविरोधातील लढा, एमपीएससी विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि युवकांच्या रोजगारासाठी महाविकास आघाडीने केलेल्या संघर्षाचा या विजयात मोठा वाटा असल्याचे सांगितले. तर गोकुळचा पॅटर्न राज्यभर प्रसिद्ध झाला असून आगामी निवडणुकांमध्ये हाच पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात राबवूया, असे आवाहनही हर्षदा देशमुख-जाधव यांनी केले.
कोल्हापूरकरांप्रती कृतज्ञता! हर्षदा देशमुख-जाधव भावुक
|