ताज्या बातम्या

🌱 कोल्हापुरात ‘ग्रीन डे’ची संकल्पना — पर्यावरणपूरक जीवनशैलीकडे एक पाऊल! 🌿

Green Day in Kolhapur


By nisha patil - 10/10/2025 2:24:31 PM
Share This News:



कोल्हापूर : पर्यावरणाचे रक्षण करत प्रदूषणमुक्त, आरोग्यदायी आणि शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने ‘ग्रीन डे’ ही अभिनव संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकयन एस. यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा उपक्रम महसूल विभाग आणि जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.

या उपक्रमाचा उद्देश नागरिक, शासकीय कर्मचारी आणि शैक्षणिक संस्था यांच्यात पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करणे, प्लास्टिकमुक्त आणि हरित उपक्रमांना चालना देणे हा आहे.

हवेचा आणि पाण्याचा दर्जा सुधारण्यासाठी तसेच झाडे लावणे, सायकलचा वापर, ऊर्जा बचत यांसारख्या सवयी रुजविण्यावर भर देण्यात येणार आहे.


🌱 कोल्हापुरात ‘ग्रीन डे’ची संकल्पना — पर्यावरणपूरक जीवनशैलीकडे एक पाऊल! 🌿
Total Views: 99