बातम्या
राज्यात १५ हजार पोलिस भरतीला हिरवा कंदील
By nisha patil - 12/8/2025 4:42:25 PM
Share This News:
राज्यात १५ हजार पोलिस भरतीला हिरवा कंदील
दोन महिन्यात प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता
मुंबई – पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या हजारो तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात तब्बल १५ हजार पोलिसांच्या रिक्त पदांची भरती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस भरतीसाठी प्रतिक्षा करणाऱ्या उमेदवारांची प्रतीक्षा आता संपली आहे. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर ही भरती प्रक्रिया जलद गतीने सुरू होणार असून पुढील दोन महिन्यांत राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आजच्या बैठकीत एकूण चार मोठे निर्णय घेण्यात आले, त्यामध्ये पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर भरतीचा निर्णय हा महत्वाचा ठरला आहे. या निर्णयामुळे पोलीस दलातील मनुष्यबळाची कमतरता दूर होऊन कायदा-सुव्यवस्था अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
राज्यात १५ हजार पोलिस भरतीला हिरवा कंदील
|