विशेष बातम्या
जिल्ह्यातील प्रत्येक गावात हिरवाई निर्माण करावी – जिल्हाधिकारी अमोल येडगे
By nisha patil - 10/17/2025 3:45:59 PM
Share This News:
जिल्ह्यातील प्रत्येक गावात हिरवाई निर्माण करावी – जिल्हाधिकारी अमोल येडगे
जांभळी गावात वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्त चळवळीचा शुभारंभ
कोल्हापूर, दि. १६ : ‘आम्ही जांभळीकर फाउंडेशन’च्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त जांभळी येथील ऑक्सिजन पार्क परिसरात वृक्षारोपण आणि प्लास्टिकमुक्त चळवळीचा शुभारंभ जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते झाला.
या वेळी येडगे म्हणाले, “जांभळीकरांनी एकत्र येऊन उभारलेले हे ‘हिरवे फुफ्फुस’ संपूर्ण जिल्ह्यासाठी आदर्श आहे. प्रत्येक गावाने अशी हिरवाई निर्माण करावी.”
गावात आतापर्यंत १५ एकरांवर ५ हजार देशी झाडांची लागवड, १४३ प्रकारच्या प्रजाती आणि पर्यावरणपूरक स्थळांची निर्मिती करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे ट्री मॅन रघुनाथ ढोले, तसेच अनेक अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्ह्यातील प्रत्येक गावात हिरवाई निर्माण करावी – जिल्हाधिकारी अमोल येडगे
|