विशेष बातम्या

राज्याभिषेक दिनानिमित्त इचलकरंजी शिवतीर्थावर अभिवादन सोहळा पार

Greeting ceremony held at Ichalkaranji Shiv


By nisha patil - 6/6/2025 3:38:46 PM
Share This News:



राज्याभिषेक दिनानिमित्त इचलकरंजी शिवतीर्थावर अभिवादन सोहळा पार

प्रकाशआण्णा आवाडे, डॉ. राहुल आवाडे व आयुक्त पल्लवी पाटील यांचे शिवरायांना अभिवादन

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त इचलकरंजीतील शिवतीर्थ येथे अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

या प्रसंगी माजी मंत्री मा. आमदार प्रकाशआण्णा आवाडे, आमदार डॉ. राहुल आवाडे साहेब आणि महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

कार्यक्रमास माजी शिक्षण सभापती राजू बोंद्रे, बंडू मुळीक, पुंडलिक जाधव, भारत भोंगार्डे, तसेच शासकीय अधिकारी, विविध पदाधिकारी व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.


राज्याभिषेक दिनानिमित्त इचलकरंजी शिवतीर्थावर अभिवादन सोहळा पार
Total Views: 189