बातम्या
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंतीनिमित्त मुलांच्या शासकीय वसतिगृहात अभिवादन कार्यक्रम
By Administrator - 11/4/2026 6:28:24 PM
Share This News:
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंतीनिमित्त मुलांच्या शासकीय वसतिगृहात अभिवादन कार्यक्रम
कोल्हापूर, दि. ११ : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त इतर मागास बहुजन कल्याण विभाग, कोल्हापूर यांच्यावतीने कंदलगाव येथील मुलांच्या शासकीय वसतिगृहात जिल्हास्तरीय कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रमुख डॉ. मंजुश्री पवार यांनी महात्मा फुले यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना देत शिक्षणाचा प्रसार, स्त्री-पुरुष समानता आणि शेतकरी हक्कांसाठी त्यांनी केलेल्या संघर्षाचे महत्त्व अधोरेखित करून सामाजिक भान जपण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमास इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक सुनिता नेर्लीकर, इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी अमित घवले, तसेच दिगंबर लोहार, शितल मंडपे, अनिल खडके, मोहन हजारे, एकनाथ कुंभार, संजयबाबा करपे यांच्यासह विभागातील कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच मुलांच्या व मुलींच्या शासकीय वसतिगृहातीलविद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या प्रसंगी विद्यार्थ्यांनीही मनोगते व्यक्त केली. अमित घवले यांनी आभार मानले.
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंतीनिमित्त मुलांच्या शासकीय वसतिगृहात अभिवादन कार्यक्रम
|