बातम्या

करवीर शिवसेनेकडून बाळासाहेब ठाकरे स्मृतिदिनानिमित्त अभिवादन...

Greetings from Karveer Shiv Sena on Balasaheb


By nisha patil - 11/17/2025 3:18:45 PM
Share This News:



करवीर शिवसेनेकडून बाळासाहेब ठाकरे स्मृतिदिनानिमित्त अभिवादन...

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या १३ व्या स्मृतिदिनानिमित्त करवीर शिवसेनेतर्फे शाखा क्रमांक ३, बाल हनुमान मित्र मंडळ हॉलमध्ये अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. उंचगावचे लोकनियुक्त सरपंच मधुकर चव्हाण आणि शिवसेना करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांच्या हस्ते बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतीस विनम्र श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

 

कार्यक्रमादरम्यान "अमर रहे बाळासाहेब", "परत या बाळासाहेब" अशा जोरदार घोषणांनी वातावरण दणाणून गेले. शिवसैनिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.

या वेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, सरपंच मधुकर चव्हाण, अरविंद शिंदे, विराग करी, दीपक रेडेकर, दिनकर पोवार, सुनील चौगुले, सागर पाटील, योगेश लोहार, दत्ता फराकटे, सागर नाकट, विनय शिरसागर, आबा जाधव, दत्तात्रय विभुते, रामराव पाटील, रणजीत गाताडे, रोहन यादव, बाळासाहेब हाके, भागवत ढाकणे आदी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.


करवीर शिवसेनेकडून बाळासाहेब ठाकरे स्मृतिदिनानिमित्त अभिवादन...
Total Views: 64