बातम्या
"गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन विश्वास (आबाजी) पाटील यांना अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त मान्यवरांकडून शुभेच्छा"
By nisha patil - 4/14/2025 9:08:38 PM
Share This News:
"गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन विश्वास (आबाजी) पाटील यांना अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त मान्यवरांकडून शुभेच्छा"
गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक विश्वास नारायण पाटील साहेब (आबाजी) यांच्या अमृतमहोत्सवी (७५ व्या) वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मान्यवरांचा उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी आमचे नेते ए.वाय. पाटील साहेब यांनी आबाजींना मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांच्या सोबत जे.के. पाटील साहेब तसेच इतर अनेक मान्यवर, पदाधिकारी, हितचिंतक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमात आबाजींच्या सामाजिक, सहकारी क्षेत्रातील योगदानाची आठवण करून देत सर्वांनी त्यांच्या उत्तम आरोग्य व दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
"गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन विश्वास (आबाजी) पाटील यांना अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त मान्यवरांकडून शुभेच्छा"
|