विशेष बातम्या
कै. पी. एन. पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त अभिवादन
By nisha patil - 5/23/2025 3:31:03 PM
Share This News:
कै. पी. एन. पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त अभिवादन
राधानगरी, ता. २३ मे — काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार कै. पी. एन. पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या वेळी राधानगरी विधानसभेचे युवक नेते मा. राहुल देसाई, बिद्री साखर कारखान्याचे संचालक मा. आर. के. मोरे, गारगोटीचे लोकनियुक्त सरपंच मा. प्रकाश वास्कर, तसेच मा. सचिन पाटील यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमात कै. पाटील साहेबांच्या कार्याचा गौरव करण्यात आला व त्यांच्या सामाजिक, राजकीय योगदानाची आठवण करून दिली गेली. उपस्थित मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
कै. पी. एन. पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त अभिवादन
|