बातम्या
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त हातकणंगले व मिणचे येथे अभिवादन कार्यक्रम संपन्न
By nisha patil - 1/8/2025 10:04:22 PM
Share This News:
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त हातकणंगले व मिणचे येथे अभिवादन कार्यक्रम संपन्न
हातकणंगले, ता. १ ऑगस्ट — लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त हातकणंगले येथील जनसंपर्क कार्यालयात तसेच मिणचे गावात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात मा. आमदार डॉ. सुजित मिणचेकर (संचालक, गोकुळ दूध संघ, कोल्हापूर) यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
मिणचे येथे झालेल्या कार्यक्रमात मा. शिक्षण व अर्थ सभापती प्रवीण यादव, आदर्श शिक्षण समूहाचे प्रमुख डी. एस. घुगरे सर, मा. सरपंच संजय देसाई, युवाशक्तीचे नेते शिवाजीराव पवार, सरपंच सौ. सविता वाकसे, आदर्श पतसंस्थेचे चेअरमन एम. ए. परीट सर, तसेच अभिनंदन शिखरे, धनाजी भोसले, प्रकाश लोकरे, निलेश साळुंखे, जब्बार मोमीन, अजय कांबळे, राजू घाडगे, सुजित वायदंडे, भगवान घाडगे, पोलिस पाटील संदीप घाडगे, दावीद घाडगे, चंद्रकांत वाकसे, शशिकांत मिणचेकर, अमोल घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
हातकणंगले येथे झालेल्या अभिवादन कार्यक्रमात सरपंच दीपक पाटील, विद्याधर खोत, राकेश खाडे, रितेश हिंगलजे, सुरेश भगत यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली.
कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या सामाजिक विचारांची आठवण केली आणि समाजहितासाठी त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.a
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त हातकणंगले व मिणचे येथे अभिवादन कार्यक्रम संपन्न
|