बातम्या
भगवान महावीर अध्यासनाच्या इमारतीचे भूमिपूजन संपन्न
By nisha patil - 4/19/2025 4:59:24 PM
Share This News:
भगवान महावीर अध्यासनाच्या इमारतीचे भूमिपूजन संपन्न
ना. प्रकाश आबिटकर यांच्याकडून शासनाच्या सहकार्याची ग्वाही
शिवाजी विद्यापीठात भगवान महावीर अध्यासनाच्या इमारतीच्या बांधकामाचे भूमीपूजन ना. प्रकाश आबिटकरांच्या हस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले. शिवाजी विद्यापीठाच्या भगवान महावीर अध्यासनाच्या इमारतीसाठी शासन स्तरावरुन सर्वोतोपरी सहकार्य मिळवून देण्याची ग्वाही ना. प्रकाश आबिटकरांनी दिली.
यावेळी बोलताना ना. प्रकाश आबिटकर म्हणाले की, शासन म्हणून आम्ही नेहमी देण्याच्या भूमिकेमध्ये असतो. तथापि, विद्यापीठाच्या भगवान महावीर अध्यासनासाठी आज प्रथमच अनेक दात्यांच्या हातून देणगीनिधी स्वीकारण्याची दुर्मिळ संधीही लाभली. शिवाजी विद्यापीठाने समाजाशी नाते जोडल्याने या अध्यासनाच्या कामाची उंची वाढली आहे. हे कोल्हापुरातच होऊ शकते. विद्यापीठाने आपल्या विविध अध्यासनांच्या माध्यमातून लोकशिक्षणाचे भरीव कार्य केले आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठ हे महाराष्ट्राचे एक भूषणच ठरले आहे. यावेळी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ.गिरीश कुलकर्णी यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
भगवान महावीर अध्यासनाच्या इमारतीचे भूमिपूजन संपन्न
|