बातम्या

बानगेत जयहिंद सेवा संस्थेच्या नुतन इमारत व कुस्ती संकुल वस्तीगृह इमारतीचे भुमीपुजन थाटात

Groundbreaking ceremony of new building


By nisha patil - 10/25/2025 6:17:42 PM
Share This News:



सहकारामुळेच ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मंञी हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन
       
बानगेत जयहिंद सेवा संस्थेच्या नुतन इमारत व कुस्ती संकुल वस्तीगृह इमारतीचे भुमीपुजन थाटात 
            

बानगे, दि. २५: ग्रामीण भागातील जीवनमान उंचावण्यामध्ये सहकाराचे महत्त्वपुर्ण योगदान आहे. सध्या जिल्ह्यातील अनेक संस्था अडचणीतुन मार्गक्रमण करत असताना बानगे येथे उभारलेली जयहिंद सेवा संस्थेची इमारत  संचालक मंडळाच्या चिकाटी आणि सचोटीमुळेच शक्य झाली आहे. या संस्थेची प्रगती कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले.
         
बानगे ता. कागल येथे  जयहिंद विकास सेवा संस्थेच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा तसेच जय भवानी तालीम कुस्ती संकुलाच्या वस्तीगृहाचे भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी पुणे शिरूर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर (माऊली) कटके, कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे,  माजी आमदार के. पी. पाटील, सुरेशआण्णा हिरेमठ महाराज आदी प्रमुख उपस्थित होते.
          
मंञी मुश्रीफ म्हणाले, शेती आणि शेतकऱ्यांना सक्षम बनविण्यामध्ये विकास सेवा संस्था या मातृसंस्था आहेत. त्यामुळे शेतकरी आणि सेवा संस्थांमधील साखळी अधिक मजबुत होण्यासाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून सेवा संस्थाना सहकार्य करु.
       
यावेळी आमदार . कटके, आमदार   घोरपडे, संस्थेचे अध्यक्ष रविंद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.      यावेळी बिद्रीचे उपाध्यक्ष मनोजभाऊ फराकटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष सूर्यकांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विकासराव पाटील, बिद्रीचे संचालक के ना पाटील, आर व्ही पाटील, रणजीत मुडूकशिवाले,माजी पंचायत समिती सदस्य ए वाय पाटील - म्हाकवेकर, ॲड दत्ताजीराव राणे, कागल तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन ॲड जीवनराव शिंदे, दत्ता पाटील - केनवडेकर, उमेश पाटील, बाळासाहेब चौगुले, अमर पाटील, संतोष पाटील, राजू पाटील संस्थेचे संचालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
        
संस्था कि मिनी मंत्रालय....!
गावच्या मुख्य चौकात या संस्थेची देखणी इमारत उभारण्यात आली आहे. पहिल्या मजल्यावर नऊ दुकानगाळे,  दुसऱ्या मजल्यावर संस्था सभागृह व  संस्थेचे कार्यालय आहे. ही इमारत पाहताना मंञी श्री. मुश्रीफही भारावून गेले. जणू हे मिनी मंत्रालयच भासत असल्याचेही ते म्हणाले.
         
कुस्ती पंढरीचे भरभरून कौतुक.....!
बानगेतील मल्लांनी लाल मातीतील कुस्तीची परंपरा जपली असल्याचे आमदार श्री. कटके म्हणाले. तर कुस्तीमुळे येथील अनेकांना शासकीय सेवेत संधी मिळाली आहे. राजर्षी शाहू महाराज यांनी राजाश्रय दिलेली कुस्ती परंपरा जपणाऱ्या बानगेकरांचे कुस्तीसंकुल व वस्तीगृह उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करु, असे आश्वासनही मंत्री  मुश्रीफ यांनी दिले.
       
संतराम पाटील यांनी स्वागत केले. राजू पाटील यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन विवेक गवळी यांनी केले. धनाजी पाटील यांनी आभार मानले.


बानगेत जयहिंद सेवा संस्थेच्या नुतन इमारत व कुस्ती संकुल वस्तीगृह इमारतीचे भुमीपुजन थाटात
Total Views: 61