बातम्या
बोरपाडळे येथे ४.८५ कोटींच्या प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे भूमिपूजन
By nisha patil - 2/5/2025 4:21:32 PM
Share This News:
बोरपाडळे येथे ४.८५ कोटींच्या प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे भूमिपूजन
बोरपाडळे (ता. पन्हाळा) येथे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नुतन प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीसाठी ४ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, या इमारतीचे भूमिपूजन आमदार डॉ. विनय कोरे (सावकार) यांच्या हस्ते संपन्न झाले.
या कार्यक्रमाला तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शैलेंद्र गायकवाड, वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनिया कदम, माजी सभापती विशांत महापुरे, सरपंच शरद जाधव यांच्यासह स्थानिक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बोरपाडळे येथे ४.८५ कोटींच्या प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे भूमिपूजन
|