बातम्या

विवेकानंद कॉलेजमध्ये वंदे मातरम चे सामुहिक गायन

Group singing of Vande Mataram at Vivekananda College


By nisha patil - 8/11/2025 4:55:05 PM
Share This News:



विवेकानंद  कॉलेजमध्ये  वंदे मातरम चे  सामुहिक  गायन

कोल्हापूर दि 8 :  भारताच्या स्वातंत्र्य्‍ संग्रामात वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला अत्यंत महत्वाचे स्थान प्राप्त्‍ झाले आहे.  सदरचे गीत हे देशभक्ती, स्वाभिमान व बलिदानाची भावना जागृत करणारे ठरले आहे.

येथील विवेकानंद कॉलेज मध्ये राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम’  च्या रचनेला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दिनांक 7.11.2025 रोजी सकाळी 11.00 वाजता  महाविद्यालयातील सर्व ज्युनिअर व सिनिअर कॉलेजमधील विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यांनी सामुदायिकरित्या वंदे मातरम गीत गायन केले. 

या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली एन.एस.एस. व एन.सी.सी. विभागाच्या वतीने करण्यात आले होते.  कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रा पी आर बागडे, डॉ. विकास जाधव, प्रा संदीप पाटील,लेफ्टनंट जे आर भरमगोंडा,मेजर एस एम भोसले, ज्युनिअर व सिनिअर कॉलेजचे स्टाफ सेक्रेटरी, रजिस्ट्रार श्री एस के धनवडे  यांनी परिश्रम घेतले.


विवेकानंद कॉलेजमध्ये वंदे मातरम चे सामुहिक गायन
Total Views: 94