बातम्या

जिल्ह्यात ठिकठिकाणी वंदेमातरम् राष्ट्रगानाचे समूह गायन

Group singing of the national anthem Vande Mataram at various places in the district


By nisha patil - 7/11/2025 2:17:27 PM
Share This News:



कोल्हापूर, दि.07 : भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील एक स्फूर्तिदायक गीत आणि प्रत्येक भारतीयाच्या मनात देशभक्तीची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या ‘वंदे मातरम्’ या गीताला यंदा १५० वर्षे पूर्ण होत आहेत.

या ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या घटनेनिमित्त राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये "वंदे मातरम्" या गीताचे सामूहिक गायन आयोजित करण्यात आले होते. कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हास्तरावर तसेच सर्व तालुक्यांमध्ये सर्व विभागांतील शासकीय व निमशासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी "वंदे मातरम्" या गीताच्या सामूहिक गान प्रसंगी उपस्थित राहून सहभाग घेतला.

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अमोल येडगे, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपजिल्हाधिकारी डॉ.संपत खिलारी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. देशाला दिशा देणारे, सर्वधर्मसमभावाची भावना निर्माण करणाऱ्या या गीताने सर्व जनमानसात देशभावना जागृत होण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे.


जिल्ह्यात ठिकठिकाणी वंदेमातरम् राष्ट्रगानाचे समूह गायन
Total Views: 47