शैक्षणिक

नंदुरबारमध्ये पालक मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले  एकलव्य क्रीडा संकुल इमारतीचे नामकरण व नवीन बॅडमिंटन कोर्टाचे उद्घाटन

Guardian Minister Hasan Mushrif named the Eklavya Sports Complex building


By nisha patil - 4/18/2026 1:09:50 PM
Share This News:



नंदुरबारमध्ये पालक मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले  एकलव्य क्रीडा संकुल इमारतीचे नामकरण व नवीन बॅडमिंटन कोर्टाचे उद्घाटन
       

महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी आज नंदुरबार येथे भेट दिली.  या भेटीत जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या बॅडमिंटन कोर्टचे लोकार्पण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले.  यावेळी मंत्री श्री. मुश्रीफ यांनी पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त एस. यांच्या समवेत बॅडमिंटन खेळाचाही आनंद लुटला.
         

याबाबत अधिक माहिती अशी, महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागांतर्गत जिल्हा वार्षिक योजना सन २०२५-२०२६ मधून पोलीस मुख्यालय, नंदुरबार येथील एकलव्य क्रीडा संकुलाच्या इमारतीचे नामकरण तसेच नवीन बॅडमिंटन कोर्टाच्या कामाचे लोकार्पण व उद्घाटन  महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी आमदार सर्वश्री चंद्रकांत रघुवंशी, राजेश पाडवी, शिरीष नाईक, जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी, पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अपर पोलीस अधीक्षक श्री. आनंद कांबळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अंकुश पालवे तसेच संबंधित विभागातील अधिकारी उपस्थित होते.

पोलीस मुख्यालय परिसरातील क्रीडा सुविधांना बळकटी देणारा हा उपक्रम ठरणार असून, एकलव्य क्रीडा संकुलाच्या माध्यमातून पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना अधिक सक्षम क्रीडा सुविधा उपलब्ध होणार आहेत. नवीन बॅडमिंटन कोर्टामुळे क्रीडा संस्कृतीला चालना मिळणार असून आरोग्यदायी व सशक्त कार्यसंस्कृती निर्माण होण्यास मदत होईल, अशी भावना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली.


नंदुरबारमध्ये पालक मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले  एकलव्य क्रीडा संकुल इमारतीचे नामकरण व नवीन बॅडमिंटन कोर्टाचे उद्घाटन
Total Views: 10