विशेष बातम्या

स्मॅक भवन व सेवा दवाखान्यास पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट

Guardian Minister Prakash Abitkar


By nisha patil - 10/27/2025 2:50:02 PM
Share This News:



स्मॅक भवन व सेवा दवाखान्यास पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट

औद्योगिक परिसरातील आरोग्य, स्वच्छता व वैद्यकीय सुविधांवर चर्चा – तातडीने कार्यवाहीचे आश्वासन

शिरोली एमआयडीसी (ता. २६): कोल्हापूरचे पालकमंत्री व सार्वजनिक आरोग्य मंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांनी शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कोल्हापूरच्या (SMAC) भवन व सेवा दवाखान्यास भेट देऊन औद्योगिक परिसरातील आरोग्य, स्वच्छता व पर्यावरण समस्यांचा आढावा घेतला.

या वेळी खासदार धैर्यशील माने, माजी खासदार प्रा. संजय मंडलिक, स्मॅक चेअरमन राजू पाटील, खजनीस बदाम पाटील, आयटीआय अध्यक्ष प्रशांत शेळके, सुवर्णमहोत्सव समिती अध्यक्ष सुरेंद्र जैन, संचालक जयदीप चौगले, रणजीत जाधव, सुमंत पाटील, निमंत्रित सदस्य अजिंक्य तळेकर, ट्रेनिंग कमिटी सदस्य भीमराव खाडे, उद्योजक संजय भगत, अमोघ कामत, दिग्विजय पोतदार, राहुल करणे, तसेच वैद्यकीय प्रशासन अधिकारी डॉ. मिलिंद चौधरी उपस्थित होते.

चेअरमन राजू पाटील यांनी एमआयडीसीच्या ओपन स्पेस (OS-1) मध्ये सुरू असलेल्या शिरोली पुलाची ग्रामपंचायतीच्या कचरा डेपोमुळे निर्माण झालेल्या दुर्गंधी व प्रदूषणाबाबत निवेदन दिले. तसेच ईएसआय कमिटीच्या सभा, औषध पुरवठा व दंत उपचारातील विलंब या समस्यांवरही चर्चा झाली.

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सर्व मागण्यांवर त्वरित कार्यवाहीचे आश्वासन दिले.
कार्यक्रमादरम्यान राजू पाटील यांच्या हस्ते नामदार आबिटकर, खासदार माने व माजी खासदार मंडलिक यांचा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या मूर्ती व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.


स्मॅक भवन व सेवा दवाखान्यास पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट
Total Views: 29