बातम्या
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचा जिल्हा दौरा
By nisha patil - 4/21/2025 3:48:37 PM
Share This News:
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचा जिल्हा दौरा
कोल्हापूर : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर जिल्हा दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सोमवार, दिनांक 21 एप्रिल 2025 रोजी सकाळी 9 वाजता गारगोटी येथील निवासस्थानी अभ्यांगताची भेटीसाठी राखीव, सकाळी 10 वाजता शासकीय वाहनाने आजऱ्याकडे प्रयाण, सकाळी 10.45 वाजता आजरा येथे आगमन व दि आजरा अर्बन मल्टी स्टेट बँक मुख्य प्रशासकीय इमारत येथे सदिच्छा भेट, सकाळी 11.10 वाजता आजरा ग्रामीण रुग्णलयाकडे प्रयाण, सकाळी 11.15 वाजता आजरा ग्रामीण रुग्णालयात मोफत डायलेसीस सेंटरचे उद्घाटन व महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या लोकापर्ण सोहळ्यास उपस्थिती, सकाळी 11.45 वाजता रामतीर्थ पतसंस्था, आजऱ्याकडे प्रयाण, सकाळी 11.45 वाजता रामतीर्थ पतसंस्था, आजरा रौप्य महोत्सवी वर्ष व नूतन इमारत शूभारंभ सोहळ्यास उपस्थिती, दुपारी 12.15 ते दुपारी 2 वाजपर्यंत गारगोटी निवासस्थानाकडे आगमन व राखीव, दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय ताराराणी सभागृहकडे प्रयाण, दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन व जिल्हा परिषदेकडील अनुकंपा तत्वावर नियुक्त उमेदवारांना नियुक्ती आदेश वाटपाच्या कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान, कोल्हापूरच्या अनुषंगाने बैठकीस उपस्थिती, सायं. 5 वाजता कोल्हापूर शिवाजी महाराज स्टेडियमकडे प्रयाण, सायं.5.10 वाजता कोल्हापूर शिवाजी महाराज स्टेडियमधील अद्ययावत जलतरण तलावाचे उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती, सायं.5.30 वाजता शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण, सायं. 5.40 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आरोग्य सेवा मंडळ, कोल्हापूर अंतर्गत सर्व जिल्हाशल्यचिकित्सक व सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या समवेत आढावा बैठक, रात्री 8.30 वाजता शासकीय मोटारीने शासकीय विश्रामगृह येथून श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनल कोल्हापूरकडे प्रयाण, रात्री 8.50 वाजता कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करण्यात होणार आहे.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचा जिल्हा दौरा
|