विशेष बातम्या

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचा जिल्हा दौरा

Guardian Minister Prakash Abitkars district tour


By nisha patil - 4/26/2025 3:01:07 PM
Share This News:



पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचा जिल्हा दौरा
 

 कोल्हापूर : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री  प्रकाश आबिटकर जिल्हा दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे शनिवार, दिनांक 26 एप्रिल 2025 रोजी सकाळी 9.50 वाजता गारगोटी ता. भुदरगड जि. कोल्हापूर येथील निवासस्थानावरुन शासकीय वाहनाने अशोका मल्टीपर्पज हॉल खानापूर ता. भुदरगडकडे प्रयाण. सकाळी 10 वाजता  अशोका मल्टीपर्पज हॉल खानापूर, ता. भुदरगड येथे आगमन व महाराष्ट्र राज्य  जुनी पेन्शन संघटना, शाखा भुदरगड आणि पंचायत समिती भुदरगड यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2024-25 वर्षातील 4 थी व 7 वी तील प्रज्ञाशोध परीक्षा मार्गदर्शन शिक्षकांची गुणगौरव सोहळ्यास उपस्थिती.

सकाळी 10.30 वाजता अशोका मल्टीपर्पज हॉल खानापूर ता. भुदरगड येथून नवीन अंबाबाई देवालय राधानगरी कडे प्रयाण. सकाळी 11 वाजता नवीन अंबाबाई देवालय राधानगरी येथे आगमन व कै. रेवताबाई दत्तात्रय एकावडे चॅरिटेबल ट्रस्ट राधानगरी यांच्यावतीने विविध क्षेत्रातील पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थिती.  दुपारी 12 वाजता नवीन अंबाबाई देवालय, राधानगरी येथून हॉटेल ऑर्चिड, पडळी ता. राधानगरीकडे प्रयाण. दुपारी 12.15 वाजता हॉटेल ऑर्चिड पडळी ता. राधानगरी येथे आगमन व राजर्षी शाहू पत्रकार संघ, राधानगरी तालुका यांच्यावतीने आयोजित सत्कार समारंभ सोहळ्यास उपस्थिती. दुपारी 2.15 वाजता हॉटेल ऑर्चिड पडळी ता. राधानगरी येथून  बाबूराव राणे, पडळी ता. राधानगरी यांच्या निवासस्थानाकडे प्रयाण. दुपारी 2.25 वाजता बाबूराव राणे, पडळी ता. राधानगरी यांच्या घरी आगमन व सात्वनपर भेट. दुपारी 3 वाजता पडळी ता. राधानगरी येथून ग्रामीण रुग्णालय, सोळांकुर ता. राधानगरी कडे प्रयाण. दुपारी 3.30 वाजता ग्रामीण रुग्णालय, सोळांकूर येथे आगमन व MJPAY योजनेच्या शुभांरभ सोहळ्यास उपस्थिती राहणार आहे.
 

सायंकाळी 4 वाजता ग्रामीण रुग्णालय सोळांकुर येथून माळवाडी, सरवडे ता. राधानगरी कडे प्रयाण. सायंकाळी 4.20 वाजता माळवाडी सरवडे ता. राधानगरी येथे आगमन व श्री. विजय पाटील, वरिष्ठ पत्रकार दैनिक तरुणभारत यांच्या घरी सांत्वनपर भेट. सायंकाळी 4.40 वाजता माळवाडी, सरवडे ता. राधानगरी येथून मुदाळ ता. भुदरगड कडे प्रयाण. सायंकाळी 5 वाजता मुदाळ ता. भुदरगड येथे आगमन व स्व. वाय. के. पाटील (आप्पा) यांच्या घरी सांत्वनपर भेट. सोईनुसार मुदाळ ता. भुदरगड येथून गारगोटी ता. भुदरगड निवासस्थानाकडे प्रयाण. सोईनुसार गारगोटी ता. भुदरगड येथील निवासस्थानी आगमन, राखीव व मुक्काम करणार आहे.


पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचा जिल्हा दौरा
Total Views: 137