बातम्या

आंबोली येथील ऊस विकास चर्चासत्रात प्रगतशील शेतकरी अशोक गुरव यांचे  मार्गदर्शन

Guidance provided by progressive farmer Ashok Gurav


By nisha patil - 5/11/2026 2:28:23 PM
Share This News:



आंबोली येथील ऊस विकास चर्चासत्रात प्रगतशील शेतकरी अशोक गुरव यांचे  मार्गदर्शन

*आजरा(हसन तकीलदार)-: सावंतवाडी कृषी विभाग यांच्यामार्फत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, आंबोली येथे ऊस विकास याविषयी चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रासाठी प्रमुख वक्ते म्हणून प्रगतशील शेतकरी अशोक महादेव गुरव, गवसे ता. आजरा यांचे मार्गदर्शन ठेवण्यात आले होते.अशोक गुरव हे ऊस शेतीत नवनवीन प्रयोग करीत असतात.ऊसाचे जास्तीत जास्त एकरी उत्पन्न घेणारे प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांची ख्याती आहे. ऊस पीक स्पर्धामध्ये त्यांनी बक्षिसे पटकवली आहेत. त्यांचे मार्गदर्शन आज येथील शेतकऱ्यांना लाभले.
         

या मेळाव्याला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अधिकारी अमित पाटील व संशोधक नामदेव शिरपूरकर,तालुका कृषी अधिकारी विजय पाटील,पंचायत समिती सदस्य मायकल डिसोजा यांची प्रमुख उपस्थिती होती .

दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मान्यवरांचे स्वागत झाल्यानंतर प्रमुख वक्ते  अशोक गुरव यांचे मार्गदर्शन झाले.त्यामध्ये जमिनीची सुपीकता,ऊस लागणीची योग्य पद्धत, रासायनिक खतांच्या मात्रा, पाण्याचे योग्य व्यवस्थापन, पीक संरक्षण या प्रमुख मुद्द्यांवर सखोल मार्गदर्शन केले.सद्या शेत जमिनीचे क्षेत्र घटत आहे.त्याचप्रमाणे वाढता उत्पादन खर्च आणि मजुरांची टंचाई यासाठी शेतकऱ्यांना एकरी उत्पन्न वाढवण्याबरोबरच आधुनिक तंत्राचा वापर करून शेती करणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी समर्पक आणि योग्य उत्तरे देऊन शेतकऱ्यांचे समाधान केले.
 

मेळावा अगदी उत्तमरीत्या पार पडला. आपल्याच भागातील प्रगतशील शेतकऱ्याने या सर्व विषयांवर चांगले मार्गदर्शन केल्याबद्दल शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
यावेळी आंबोलीचे सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच भागातील सर्व शेतकरी बंधू-भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


आंबोली येथील ऊस विकास चर्चासत्रात प्रगतशील शेतकरी अशोक गुरव यांचे  मार्गदर्शन
Total Views: 55