बातम्या

*चंदगड येथील आनंदवाडी येथे विद्यार्थ्यांना योग्य-अयोग्य वर्तनासह करिअरविषयी मार्गदर्शन

Guidance provided to students at Anandwadi


By nisha patil - 9/29/2026 8:16:41 PM
Share This News:



*चंदगड येथील आनंदवाडी येथे विद्यार्थ्यांना योग्य-अयोग्य वर्तनासह करिअरविषयी मार्गदर्शन
 

 *आजरा(हसन तकीलदार) — संत अँथोनी इंग्लिश मीडियम स्कूल, आनंदवाडी (वैताकवाडी) ता.चंदगड येथे शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेहोते. या कार्यक्रमात चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी विद्यर्थ्यांशी संवाद साधत त्यांना योग्य-अयोग्य वर्तन, सुरक्षितता, शिस्त तसेच करिअरच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
                 

यावेळी विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात कोणते वर्तन योग्य आहे आणि कोणत्या गोष्टींपासून दूर राहणे आवश्यक आहे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सोशल मीडिया, मोबाईलचा वापर, चुकीच्या संगतीपासून दूर राहणे, स्वतःची सुरक्षितता तसेच अडचणीच्या प्रसंगी पोलिसांची मदत घेण्याबाबतही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
 

तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या आवडी निवडी,क्षमता आणि कौशल्यांचा विचार करून भविष्यातील करिअरची दिशा ठरवावी, असे सांगत शिक्षणासोबतच शिस्त, आत्मविश्वास, मेहनत, जिद्द आणि चांगले संस्कार यांचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले.
 

कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना योग्य वर्तनाबाबत जागरूकता मिळण्यासोबतच भविष्यातील करिअरविषयी नवी दिशा मिळाली. कार्यक्रमास शाळेच्या सिस्टर मारिया, सिस्टर ग्लेंडा, शिक्षिका स्नेहल पल्लवी,पोलीस पाटील सौ.माधुरी कांबळे, ग्रामपंचायत सदस्या सावित्री गावडे तसेच कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


*चंदगड येथील आनंदवाडी येथे विद्यार्थ्यांना योग्य-अयोग्य वर्तनासह करिअरविषयी मार्गदर्शन
Total Views: 141