राजकीय
प्रधानमंत्री सूर्यघर व सौर कृषी योजनांचे नागरिकांना मार्गदर्शन
By nisha patil - 8/16/2025 1:35:05 PM
Share This News:
महावितरणची सौर ऊर्जेसाठी जनजागृती फेरी
प्रधानमंत्री सूर्यघर व सौर कृषी योजनांचे नागरिकांना मार्गदर्शन
स्वातंत्र्य दिनानिमित्त आजरा शाखा महावितरणतर्फे प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना आणि सौर ऊर्जेच्या विविध योजनांचा प्रचार करण्यासाठी जनजागृती फेरी काढण्यात आली. नागरिकांना सौर ऊर्जेचे फायदे, अनुदान व सबसिडीची माहिती देण्यात आली.
उपकार्यकारी अभियंता दयानंद आष्टेकर यांनी सौर कृषी पंप, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी व सूर्यघर मोफत वीज योजनेचे फायदे सांगितले. तर सोहम ग्रीन एनर्जीच्या संचालिका सोनिया शिंदे यांनी सौर पॅनल्सच्या वापराबाबत मार्गदर्शन केले. या फेरीत अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
तारा न्यूज साठी हसन तकीलदार आजरा.
महावितरणची सौर ऊर्जेसाठी जनजागृती फेरी
|