बातम्या

सेंद्रिय व नैसर्गिक शेतीवरील मार्गदर्शन कार्यशाळा यशस्वी — डॉ. प्रशांत नाईकवाडी यांचे मार्गदर्शन

Guidance workshop on organic and natural farming successful

By nisha patil - 11/15/2025 5:30:17 PM
Share This News:

सेंद्रिय व नैसर्गिक शेतीवरील मार्गदर्शन कार्यशाळा यशस्वी — डॉ. प्रशांत नाईकवाडी यांचे मार्गदर्शन

दिनांक 11 नोव्हेंबर 2025, बॉश इंडिया फाउंडेशन, निर्णय फाउंडेशन आणि नाशिक जिल्हा कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती पद्धती आणि शासकीय योजना या विषयावर एक दिवसीय मार्गदर्शन कार्यशाळा मेट चंद्राची, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक येथे आयोजित करण्यात आली.

या कार्यक्रमासाठी रोमिफ इंडिया संस्थेच्या वतीने डॉ. प्रशांत नाईकवाडी यांना विशेष मार्गदर्शनासाठी निमंत्रित करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या व्यासपीठावर आत्मा प्रकल्प संचालक श्री. अभिमन्यू काशीद, बॉश फाउंडेशनच्या सौ. अश्विनी पावसकर, युनिसेफचे नंदकुमार जाधव, तसेच निर्णय फाउंडेशनच्या सौ. संगीता बालोडे, सौ. मोहिनी भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत कार्यक्रमाला उत्साहाने प्रतिसाद दिला.

सेंद्रिय व नैसर्गिक शेतीवरील मार्गदर्शन कार्यशाळा यशस्वी — डॉ. प्रशांत नाईकवाडी यांचे मार्गदर्शन
Total Views: 42