बातम्या
गाईड निसार नगारजी यांचा प्रामाणिकपणा; हरवलेली पर्स पोलीसांच्या मदतीने मालकाच्या स्वाधीन
By nisha patil - 5/31/2025 3:20:47 PM
Share This News:
गाईड निसार नगारजी यांचा प्रामाणिकपणा; हरवलेली पर्स पोलीसांच्या मदतीने मालकाच्या स्वाधीन
पन्हाळा पन्हाळागडावरील तबक उद्यान येथे पर्यटकांना माहिती देताना गाईड म्हणून कार्यरत असलेले निसार नगारजी यांना एका पर्यटकांची काळ्या रंगाची पर्स सापडली. प्रामाणिकपणे त्यांनी ती पर्स त्वरित पन्हाळा पोलीस ठाण्यात जमा केली.
पोलीसांनी तपासणी केली असता, सदर पर्समध्ये अंदाजे दीड तोळ्याचे मंगळसूत्र आणि सुमारे ₹80,000 रोख रक्कम होती. पुढील तपासात पर्सचे मालक श्री. शामल थोरात, रा. वांद्रे, मुंबई हे असल्याचे स्पष्ट झाले. त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून प्रभारी अधिकारी मा. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. बोंबले यांच्या समोर संपूर्ण वस्तू परत करण्यात आल्या.
निसार नगारजी यांच्या या प्रामाणिकपणाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे. पर्यटकांच्या सुरक्षेप्रमाणेच त्यांच्या हरवलेल्या वस्तूही प्रामाणिकपणे परत केल्या जात असल्याचा हा उत्तम उदाहरण ठरले आहे.
गाईड निसार नगारजी यांचा प्रामाणिकपणा; हरवलेली पर्स पोलीसांच्या मदतीने मालकाच्या स्वाधीन
|