बातम्या
शक्तीपीठ महामार्गासाठी आमदारांच्या डोक्यावर बंदूक!" – सतेज पाटील यांचा गंभीर आरोप
By nisha patil - 7/22/2025 11:21:18 AM
Share This News:
शक्तीपीठ महामार्गासाठी आमदारांच्या डोक्यावर बंदूक!" – सतेज पाटील यांचा गंभीर आरोप
"दबावाखाली आमदारांचे मत; खाजगीत वेगळे बोलतात" – सतेज पाटील यांचा इशारा
"शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ आंदोलन करा, यासाठी चंदगडचे आमदार शिवाजी पाटील आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्या डोक्यावर बंदूक ठेवली आहे," असा खळबळजनक आरोप काँग्रेसचे गटनेते आणि विधानपरिषदेचे आमदार सतेज पाटील यांनी केला. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीनंतर ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.सतेज पाटील म्हणाले, “शक्तीपीठाच्या समर्थनार्थ काही आमदारांनी घेतलेली भूमिका ही दबावाखाली घेतलेली आहे. खाजगीत हेच आमदार या विषयावर वेगळं मत मांडतात. त्यामुळे यामागे दबावतंत्र आणि आदेशाचे राजकारण सुरू आहे.” जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द झालेल्या सातबारा उताऱ्यांबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आणि विरोधकांनी दाखल केलेल्या हरकतींवर शंका व्यक्त केली...
शक्तीपीठ महामार्गासाठी आमदारांच्या डोक्यावर बंदूक!" – सतेज पाटील यांचा गंभीर आरोप
|