बातम्या
गुरबीरसिंगचे चक दे फटे...
By nisha patil - 8/5/2026 7:37:33 PM
Share This News:
*गुरबीरसिंगचे चक दे फटे...*
सदर बाजार विचारेमाळ झोपडपट्टी येथील शीख गल्लीमध्ये लखनसिंग टाक आपली पत्नी आणि तीन मुलांसह रहातात . कोरगांवकर हायस्कूलमध्ये कष्ट करून शिकणारा म्हणून गुरबीर सिंगची वेगळी ओळख .त्याचे वडील लखनसिंग हे मुळचे पंजाबचे असले तरी कोल्हापूरवासी होवून त्यांना पन्नास वर्ष लोटलेली .
घरी अठराविश्व दारिद्रय आणि त्यापासून सुटका करण्यासाठी त्यांनी आपल्या पणजोबा पासून चालत आलेल्या पारंपारिक शेगडी, पत्र्याची बुट्टी,झारा,नगारे, हलगीची कडी लादी, हातोडी अशी श्रमशक्ती वापरून पापाची तिकटी, गंगावेश आदी भागांमध्ये विक्रीस गुरुबीरसिंग आपल्या वडिलांसोबत जात असे .
अनेकदा शनिवार, रविवार याच कारणासाठी गुरबीरसिंगचा खर्ची पडत असे . कोणताही क्लास नाही घर, कष्ट आणि अभ्यास या त्रिसुत्रीवर गुर बीरसिंगने हे लख्ख यश मिळवले . गुरबीरसिंगचा कष्टावर विश्वास आहे परिस्थितीवर मात करीत त्याने चक दे फटे... केले आहे . शीख समाजात दहावी पास होणारा गुरबीरसिंग हा चौथ्या पिढीतील पहिलाच .त्याच्या यशात मुख्याध्यापक संजय सौंदलगे, सुरेखा पोवार यांचे प्रोत्साहन आणि वर्गशिक्षक सुभाष बेलवळेकर व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले . गुरबीरसिंगला कौशल्य शिक्षण घेवून स्वावलंबी व्हायचे आहे . त्याच्या जिद्दीला सलाम .
गुरबीरसिंगचे चक दे फटे...
|