शैक्षणिक
शहाजी महाविद्यालयामध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
By nisha patil - 11/7/2025 6:41:50 PM
Share This News:
शहाजी महाविद्यालयामध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
कोल्हापूर : श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयामध्ये कनिष्ठ विभाग सांस्कृतिक समिती मार्फत गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने कनिष्ठ विभागातील सांस्कृतिक विभागाचे उद्घाटन व महाविद्यालयाची प्रार्थना गायन स्पर्धा घेण्यात आली.निकाल पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक -गुंजन खुर्दाळे (१२ वाणिज्य), द्वितीय क्रमांक -प्राप्ती पाटील (१२ वाणिज्य), तृतीय क्रमांक- देविका शेंडगे (१२ वाणिज्य) या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर के शानेदिवाण यांनी भूषिवले, तसेच IQSC समन्वयक डॉ. राहुल मांडणीकर , स्टॉफ सेक्रेटरी डॉ. दीपक वळवी , कनिष्ठ विभाग पर्यवेक्षक श्री पि. के. पाटील सांस्कृतिक विभाग समिती प्रमुख सौ. एम एम गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर के शानेदिवाण यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये आपल्या जीवनातील गुरूंचे स्थान आणि प्रार्थने द्वारे रुजविल्या जाणाऱ्या मूल्य संस्कारा विषयी मार्गदर्शन केले. सांस्कृतिक विभाग समिती प्रमुख सौ.एम एम गायकवाड यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. श्री.एन एस पाटील यांनी आभार मानले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रशांत मोटे सर यांनी केले.
या उपक्रमास श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे दादा यांचे प्रोत्साहन मिळाले.
शहाजी महाविद्यालयामध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
|