बातम्या
गुरुदत्त कारखान्याने उत्पादकांना स्पर्धात्मक दर द्यावा .. आंदोलन अंकुश संघटना .
By nisha patil - 10/11/2025 5:27:17 PM
Share This News:
गुरुदत्त कारखान्याने उत्पादकांना स्पर्धात्मक दर द्यावा .. आंदोलन अंकुश संघटना .
चालू वर्षी उसदरावर संघटनांशी चर्चा न करता टाकळीवाडी येथील श्रीगुरुदत्त साखर कालपासून सुरू करण्यात आला होता. पण जाहीर केलेला दर मान्य नसल्यामुळे आंदोलन अंकुश चे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांनी टाकळी येथील चौकामध्ये ऊस वाहतूक रोखली होती त्यावेळी कारखान्याच्या शेती विभागाकडुन चर्चेतून मार्ग काढु दरवर्षीचा संघर्ष कारखान्याला परवडणार नाही असे आश्वासन दिले होते.
त्यानुसार आज आंदोलन अंकुश संघटनेचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे व त्यांचे सर्व सहकारी यांनी कारखान्याचे शेती अधिकारी श्री विजय जाधव व व सीडीवो श्री रंगाप्रसाद सिनिधी यांचे बरोबर चर्चा केली. यावेळी कालच्या श्रीदत्त कारखान्याच्या चर्चेतील तोडग्याप्रमाणे चालू वर्षी पहिला हप्त्ता एक रकमी 3450 व उर्वरित 50 रुपये हंगाम संपल्यानंतर असे कारखान्याकडून जाहीर करण्यात आले आहे असे सांगितले. पण शेतकऱ्यांनी कारखान्याने याहीपेक्षा जास्त स्पर्धात्मक दर द्यावा अशी मागणी केली .
तसेच जवळच्या उसाला वाहतूक खर्च कमी येत असल्यामुळे 200 रुपये प्रति टन दर जास्त द्यावा अशी मागणी केली.
यावर सुद्धा विचार करण्याचं आश्वासन देण्यात आल.यावेळी नागेश काळे रोहन पाटील रशीद मुल्ला रणजीत पाटील धनंजय जगनाडे बाळू पाटील अरिहंत शिरहट्टी सुनील पाटील कृष्णात मिरजे प्रवीण पाटील भैय्या पाटील सचिन वाणीसंभाजी पाटील सुधीर पाटील विजय पाटील इत्यादी शेतकरी उपस्थित होते
गुरुदत्त कारखान्याने उत्पादकांना स्पर्धात्मक दर द्यावा .. आंदोलन अंकुश संघटना .
|