बातम्या

प्राथमिक आरोग्य केंद्र वाटंगी येथे एच. पी. व्ही.लसीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ

H  P V Vaccination program launched


By nisha patil - 12/3/2026 11:07:51 PM
Share This News:



प्राथमिक आरोग्य केंद्र वाटंगी येथे एच. पी. व्ही.लसीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ

*आजरा(हसन तकीलदार )*:-मुलींना गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळावे या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या एच. पी. व्ही.लसीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ आज प्राथमिक आरोग्य केंद्र, वाटंगी येथे सुधीरभाऊ देसाई  (सदस्य, जि.प. कोल्हापूर) यांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी सौ.यशोदा पोवार (उपसभापती, पंचायत समिती आजरा), समीर पारधे  (सदस्य, पं.स. आजरा),अल्बर्ट डिसोजा  (माजी सभापती), डॉ.आर. जी. गुरव (तालुका आरोग्य अधिकारी) तसेच डॉ.शेख मॅडम (वैद्यकीय अधिकारी) यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आर. जी.गुरव यांनी मुलींच्या आरोग्याच्या दृष्टीने एच. पी. व्ही.लसीकरण अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. गर्भाशय मुखाच्या कर्करोगासारख्या गंभीर आजारापासून संरक्षण मिळविण्यासाठी पालकांनी आपल्या मुलींना वेळेत लस देण्याचे आवाहन त्यांनी केले. शासनाच्या या उपक्रमामुळे मुलींच्या आरोग्याचे संरक्षण होण्यास मोठी मदत होणार असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक  महेश कोळेकर यांनी केले. कार्यक्रमास प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी, आशा सेविका व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


प्राथमिक आरोग्य केंद्र वाटंगी येथे एच. पी. व्ही.लसीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ
Total Views: 4