बातम्या
बहिरेवाडीचे एच आर जाधव यांना राष्ट्रीय आदर्श संस्था पुरस्काराने सन्मानित
By nisha patil - 7/5/2025 4:38:51 PM
Share This News:
बहिरेवाडीचे एच आर जाधव यांना राष्ट्रीय आदर्श संस्था पुरस्काराने सन्मानित
वारणानगर : बहिरेवाडी (ता. पन्हाळा ) येथील एचआर जाधव सहकार समूहाचे संस्थापक आणि वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच आर जाधव यांना नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन बेळगावी व इंटिग्रेटेड सोशल वेलफेअर सोसायटी बेळगाव यांच्यावतीने राष्ट्रीय आदर्श सहकारी संस्था पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
एच आर जाधव यांनी बहिरेवाडी येथे सहकारमहर्षी स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांच्याकडून सहकाराचे धडे घेऊन वारणा विविध उद्योगाच्या माध्यमातून व त्यांच्या प्रेरणेतून सहकाराचे मोठे जाळे निर्माण केले.तात्यासाहेब कोरे वि.का.स सेवा संस्था,विलासराव कोरे फळे व भाजीपाला खरेदी विक्री संस्था,आदर्श ग्रामीण पतसंस्था, श्री.दत्त दूध व्यावसायिक संस्था,शुभलक्ष्मी महिला औद्योगिक संस्था,विनयरावजी कोरे तेल-बिया खरेदी-विक्री संस्था त्यांनी निर्माण केल्या आहेत या पुरस्कारासाठी आमदार डॉ.विनय कोरे यांचे सहकार्य लाभले.पणजी-गोवा येथे दिल्ली, गुजरात, गोवा,कर्नाटक, महाराष्ट्र राज्यातूंन निवडक व्यक्तिमध्ये एच आर जाधव यांची निवड झाली होती ग्रामीण सहकारात केलेल्या कार्याची दखल घेवून श्री.जाधव यांना बेळगाव जिल्हयाचे कमाउंट अरविंद घट्टी यांच्या हस्ते राष्ट्रीय आदर्श सहकारी संस्था गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
बहिरेवाडीचे एच आर जाधव यांना राष्ट्रीय आदर्श संस्था पुरस्काराने सन्मानित
|