विशेष बातम्या

कोल्हापुरात एचआयव्ही प्रतिबंध मोहिमेला गती! ६९ हजारांहून अधिक टेस्ट, २६७ पॉझिटिव्ह प्रकरणे

HIV prevention campaign gains momentum in Kolhapur


By nisha patil - 1/11/2025 4:52:23 PM
Share This News:



कोल्हापुरात एचआयव्ही प्रतिबंध मोहिमेला गती! ६९ हजारांहून अधिक टेस्ट, २६७ पॉझिटिव्ह प्रकरणे

कोल्हापूर जिल्ह्यात यावर्षी आतापर्यंत उद्दिष्टापेक्षा अधिक म्हणजेच तब्बल ६९,४७० एचआयव्ही तपासण्या करण्यात आल्या असून, त्यापैकी २६७ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. याची टक्केवारी ०.४ टक्के इतकी आहे.

यामध्ये ३४,३५६ गरोदर मातांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी १० महिला पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. मात्र, वेळेत घेतलेल्या औषधोपचारांमुळे या मातांकडून झालेल्या ३८ बालकांपैकी एकाही बाळाला एचआयव्ही संसर्ग झालेला नाही, ही समाधानकारक बाब जिल्हा एड्स प्रतिबंध समितीच्या बैठकीत सांगण्यात आली.

या बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले की, “सेक्स वर्कर, स्थलांतरित कामगार, गरोदर महिला आणि क्षयरोगी यांसारख्या जोखीम गटांमध्ये १०० टक्के एचआयव्ही तपासण्या कराव्यात. आवश्यकता भासल्यास तपासणी किटसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी उपलब्ध करून दिला जाईल.”

बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, डॉ. रेश्मा पाटील, दीपा शिपूरकर, डॉ. हर्षला वेदक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जागतिक युवा दिनानिमित्त जिल्ह्यातील समुपदेशन केंद्रांमार्फत इंटेन्सिफाइड आयईसी कॅम्पेन राबविण्यात येत असून, शाळा, महाविद्यालये आणि ग्रामपंचायतींमध्ये एचआयव्हीबाबत जनजागृती व संवेदीकरण सुरू आहे. या उपक्रमाचे जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केले.


कोल्हापुरात एचआयव्ही प्रतिबंध मोहिमेला गती! ६९ हजारांहून अधिक टेस्ट, २६७ पॉझिटिव्ह प्रकरणे
Total Views: 33